Ad will apear here
Next
‘भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ’
पुणे : ‘भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१४ मे) पुण्यात केले. ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, पुस्तकाचे लेखक प्रशांत पोळ, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतीय विज्ञानाचा पाया शाश्वत विकासावर आधारित आहे. यामध्ये कला, शास्त्र, खगोल, भूगोल, गणित, भूमिती, यांत्रिकी, गती अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. तो अतिशय शास्त्रशुद्ध आहे. पाश्चिमात्य देशाकडून शास्त्र आणि विज्ञान आपल्याकडे आले आहे, असा आपला समज आहे; पण या सर्व शास्त्रांचा विचार भारतीय विज्ञानात केला गेलेला आहे.’ 

‘भारतीय विज्ञानात एकात्म भाव आहे. निसर्गाशी साधर्म्य आहे. हा भाव निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणारा आहे. या भावाची या पुस्तकात केलेली मांडणी अतिशय चांगली आहे. ही मांडणी नव्या पिढीला आपल्या विज्ञानाबाबतची नवी माहिती देऊ शकेल. तरुण पिढीला प्रेरित करील,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

‘भारतातील विविध शास्त्रे अतिशय प्रगत होती. त्यासाठी भारतीय वैज्ञानिक ज्या परिमाणांचा वापर करत होते. त्याचा अभ्यास केला असता आपल्याला आजही थक्क व्हायला होते. सुश्रुत यांनी प्लास्टिक सर्जरीबाबत केलेले संशोधन किंवा धातुशास्त्राबाबात केलेली प्रगती ही भारतीय विज्ञान प्रगत असल्याची चिन्हे आहेत. यावर अजून संशोधन आणि लिखाण होण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. ‘भारतीय विज्ञान अतिशय प्रगत होते हे प्रशांत पोळ यांनी पुराव्यासहित सिद्ध केले आहे. त्यांचे हे पुस्तक भारतीय विज्ञानाकडे आपल्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते. त्यांचे हे पुस्तक नव्या पिढीला अतिशय उपयुक्त आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉ. गो. बं. देगलूरकर यांचीही भाषणे झाली. लेखक प्रशांत पोळ आणि प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आरती आत्रे यांनी, तर आभारप्रदर्शन आदित्य घाटपांडे यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZLNBC
Similar Posts
देवेंद्र फडणवीस यांच्यावरील पुस्तकाचे २४ एप्रिलला प्रकाशन मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी साडेतीन वाजता पार पडणाऱ्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी
‘कर्ज मुदतीत फेडावे’ पुणे : ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी चालना देण्याचे काम होत आहे. त्यातून तरुणांनी चांगला व्यवसाय करून महामंडळाने दिलेले कर्ज मुदतीत फेडावे,’ असे आवाहन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले
जगदीश मुळीक यांची शिवार संवाद सभा पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शिवार संवाद सभा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आल्या. आमदार जगदीश मुळीक यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यांचा दौरा करून शिवार संवाद सभा घेतल्या आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सरकारच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच
‘पारंपरिक, आधुनिक विज्ञानाच्या संगमातूनच शाश्वत विकास शक्य ’ पुणे : ‘भारत प्राचीन काळापासून विज्ञानात प्रगत होता. भारतीय पारंपरिक विज्ञान हे निसर्गावर आधारित असल्याने ते शाश्वत विकासाचे साधन आहे. भारतीय पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुयोग्य संगमच जगाला विकासाचा नवा शाश्वत प्रकाश दाखवील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१४ मे) पुण्यात व्यक्त केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language